Viral Video | मंदिरातील आरतीसाठी बकरीची उपस्थिती, व्हिडिओ बघून व्हाल थक्क!
टीम महाराष्ट्र देशा: आजकाल सोशल मीडियावर आपण अनेक व्हिडिओ बघत असतो. त्यामध्ये अनेक पाळीव प्राण्यांचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतात. या व्हिडिओमध्ये अनेकदा क्यूट किंवा फनी व्हिडिओचा समावेश होतो. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये आपल्याला काहीतरी निराळाच प्रकार दिसत आहे.
भारतामध्ये प्रत्येक धर्माचे लोक राहतात. देशामध्ये अनेक भागात दररोज देवांची पूजा आरती केली जाते. दररोज अनेक भाविक मोठ्या भक्तीने देवासमोर डोके टेकवून देवाची प्रार्थना करताना दिसतात. पण तुम्ही कधी एखाद्या मुक्या प्राण्याला देवाची आराधना करताना पाहिले आहे का? नसेल, तर आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओद्वारे ते दाखवू. सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक बकरी मंदिराच्या दारात डोके टिकून देवाची प्रार्थना करताना दिसत आहे.
बकरीची देवाला मनोभावे प्रार्थना
सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला काहीतरी वेगळच बघायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये एक बकरी मंदिराच्या दारात आपले पाय टेकून जमिनीवर डोके टेकवून देवाची आराधना करताना दिसत आहे. यावेळी मंदिरात सुरू असलेली देवाची आरती व्हिडिओमध्ये स्पष्ट ऐकू येत आहे. त्यामुळे ही बकरी मंदिरातील आरतीसाठी उपस्थित आहे असे प्रतीत होत आहे.
पाहा व्हिडिओ
Viral Video | मंदिरातील आरतीसाठी बकरीची उपस्थिती, व्हिडिओ बघून व्हाल थक्क! pic.twitter.com/JSZbHENIG0
— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) October 11, 2022
व्हायरल व्हिडिओ
सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ animal_lover_wagad या इंस्टाग्राम पेजद्वारे शेअर करण्यात आलेला आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर आतापर्यंत 52k पेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले असून, 6 हजारापेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- Chandrashekhar Bawankule | उद्धवजी आता पंजाशिवाय जगूच शकत नाही – चंद्रशेखर बावनकुळे
- Anil Desai। शिंदे गटाला हवंय तेच होतंय, हे आधीच ठरलेलं..”; निवडणूक आयोगाच्या निर्णयावर अनिल देसाई यांचा सवाल
- Sunil Raut | संजय राऊत म्हणाले, वरती गेल्यावर मला बाळासाहेबांना गद्दार म्हणून तोंड दाखवता आले नसते
- Best Electric Scooter | जबरदस्त रेंजसह उपलब्ध आहेत ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटर
- Chandrashekhar Bawankule | नाना पटोलेंचा पराभव साकोलीमधून झालाच पाहिजे – चंद्रशेखर बावनकुळे
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.