‘या’ एका चुकीमुळं विराटला भरावा लागतोय तब्बल १२ लाखांचा दंड !

यंदाच्या वर्षी आयपीएलचे सामने भारतात होत नसले, तरीही या सामन्यांना मिळणारी क्रीडा रसिकांची लोकप्रियता मात्र तसूभरही कमी झालेली नाही. अशाच उत्साही वातावरणात दररोज आयपीएलचे सामने पार पडत आहेत. सोशल मीडियावरही याचे पडसाद पाहायला मिळत आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात गुरुवारी पार पडलेल्या पंजाब विरुद्ध बंगळुरूच्या सामन्यात विराट कोहलीला अनेकांच्या रोषाचा सामना करावा लागला.

इतकंच नव्हे, तर त्याला याचा फटका आर्थिक स्वरुपातही बसला. सामन्या दरम्यान ‘स्लो ओवर रेट’साठी त्याला तब्बल १२ लाख रुपयांचा दंड लावण्यात आल्याचं वृत्त प्रसिद्ध केलं.

‘बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली याला IPL 2020 मधील पंजाबविरोधातील सामन्यात त्याच्या संघाच्या स्लो ओवर रेटसाठी दंड लावण्यात येत आहे’, अशी माहिती लीगकडून जाहीर करण्यात आलेल्या पत्रकातून देण्यात आली. याअंतर्गत दंडाची रक्कमही स्पष्ट करण्यात आली होती.

महत्वाच्या बातम्या :-

ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला ; अहमदनगर महानगरपालिकेत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र

सिनेसृष्टीला मोठा धक्का : ज्येष्ठ पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांचे निधन !

राज्य सरकार म्हणजे केवळ सत्तेला चिकटून बसलेले सरकार आहे

आता पुण्यातील कोरोनाचा भार हिरकणींच्या खांद्यावर !

चिंतेत वाढ : गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनाचे १९,१६४ रुग्ण वाढले

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.