Virat Kohli । नेदरलँड्स विरुद्ध खेळताना विराट कोहलीचा नवा विक्रम! ख्रिस गेलला टाकले मागे
Virat Kohli । नवी दिल्ली : T20 विश्वचषक 2022 चा 23 वा सामना भारत आणि नेदरलँड्स यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जात आहे. या रोमांचक सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या पॉवरप्लेमध्ये सलामीवीर केएल राहुल याची ३२ धावांवर विकेट पडली. 10 षटकांनंतर भारताने एक विकेट गमावून 67 धावा केल्या.
आजच्या रोमांचक सामन्यात भारतीय संघाने नेदरलँड्सला 180 धावांचे लक्ष दिले. रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतके झळकावले. याआधीच्या पाकिस्तान विरुद्धच्या टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी खेळणाऱ्या विराट कोहलीला आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या क्रमवारीतही फायदा झाला आहे. आयसीसीच्या क्रमवारीत त्याने ५ स्थानांनी झेप घेत पहिल्या १० फलंदाजांमध्ये स्थान मिळवले आहे. कोहली सध्या ६३५ गुणांसह ९व्या स्थानावर आहे.
यानंतर गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानात विराट कोहलीचा संघर्ष सुरू होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून ते आयपीएलपर्यंत त्याची बॅट शांत होती, त्यामुळे तो कधीही त्याच्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये परत येऊ शकणार नाही, असे टीकाकारांनी म्हटले. पण आशिया चषक २०२२ च्या आधी ब्रेक घेऊन परतताच विराट आपल्या जुन्या ढंगात परतण्यासाठी सज्ज झाला होता.
यानंतर आज नेदरलँड्स विरुद्ध अर्धशतक झळकावत त्याने आणखीन एक मोठं रेकॉर्ड आपल्या नावावर केलं आहे. विराट कोहली T20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ख्रिस गेलला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. यानंतर T20 विश्वचषकातील आगामी सामन्यात विराट कोहलीचा फॉम कायम राहिला तर T20 विश्वचषक स्पर्धा जिंकू शकतो, असा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Rohit Pawar | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…
- Car Update | ‘या’ गाड्यांना म्हणता येऊ शकते लाईफ सेविंग कार
- Kishori Pednekar | बच्चू कडू आणि रवी राणा यांच्या वादात किशोरी पेडणेकरांची उडी, म्हणाल्या…
- IND vs NED T20 World Cup | विराट, रोहित आणि सूर्यकुमारचे अर्धशतक, नेदरलँड्ससमोर 180 धावांचे लक्ष
- PM Kisan Mandhan Yojana | शेतकऱ्यांना मिळवता येणार दरमहा 3000 रुपयांपर्यंत पेन्शन, जाणून घ्या
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.