Virat Kohli । पाकिस्तानी चाहत्याने वाळूवर रेखाटलं विराट कोहलीच चित्र
Virat Kohli । मुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा क्रिकेटमधील सर्वात दिग्गज फलंदाज विराट कोहली याचे चाहते केवळ भारतातच नाहीत तर जगभरात आहेत. विराट कोहली याच्या फलंदाजीचे चाहते शेजारील देश पाकिस्तानमध्येही खूप आहेत, याचे उदाहरण आपल्याला नुकतेच पाहायला मिळाले. जेव्हा पाकिस्तानातील बलुचिस्तानमधील एका कलाकाराने समुद्रकिनाऱ्यावरील वाळूवर विराट कोहलीचे मोठे पोर्ट्रेट बनवले आहे. त्याच्या या चित्राला सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे. भारतातूनही या कलाकृतीला भरभरून प्रेम मिळत आहे.
बलुचिस्तानच्या समीर शौकतने विराट कोहली वाळूवर चित्र काढतानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि त्याने सांगितले आहे की भारताचा महान फलंदाज विराट कोहलीला आमच्याकडून ही भेट आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की भारत आणि पाकिस्तान (IND v PAK) यांच्यातील T20 विश्वचषक 2022 मध्ये विराट कोहलीने 82 धावांची तुफानी आणि सामना जिंकणारी खेळी खेळली होती. तेव्हापासून जगभरात त्याचे चाहते वाढले आहेत
तसेच आपापल्या परीने त्याला प्रोत्साहन देत आहेत. पाकिस्ताननंतर टीम इंडिया आणि नेदरलँड्स यांच्यातील सामन्यात विराट कोहली नाबाद राहिला आणि त्याने 62 धावांचे अर्धशतक झळकावले आणि संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. गेल्या काही वर्षांपासून विराट कोहलीचा फॉर्म चांगला जात नव्हता. त्याला T20 फॉरमॅट सोडण्याचा सल्लाही देण्यात आला होता, परंतु इंग्लंड दौऱ्यानंतरचा दीर्घ विश्रांती आणि आशिया चषकातील चमकदार कामगिरी आता T20 विश्वचषकातही दिसून येत आहे. विराट परतला असून आता तो या स्पर्धेतील सर्व संघांसाठी मोठा धोका ठरेल, असा विश्वास क्रिकेट चाहत्यांना आहे.
महत्वाच्या बातम्याः
- SSC Recruitment | स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC यांच्यामार्फत ‘या’ पदांसाठी बंपर भरती
- MNS | “… तर मुंबई पोखरणारी घुस निघाली”, मनसेचा किशोरी पेडणेकरांना खोचक टोला
- Bachhu Kadu । “मला गुवाहाटीवरून परत यायचं होतं, पण…”; बच्चु कडूंचा मोठा खुलासा
- Bachhu Kadu । “आधी मला लोक विरूवाले आमदार म्हणायचे, मग भिडू, आता खोकेवाले…”; बच्चू कडूंनी व्यक्त केली खंत
- Bacchu Kadu | “आजही मला ठाकरेंबद्दल आस्था पण…”; बच्चू कडू यांनी शिंदेंसोबत जाण्याचे सांगितले कारण
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.