Virat Kohli & Anushka Sharma | विराट-अनुष्का लेकीसोबत वृंदावन दौऱ्यावर, पाहा VIDEO

Virat Kohli & Anushka Sharma | वृंदावन: भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) मुलगी वामिकासोबत वृंदावन दौऱ्यावर गेले आहेत. विराट आणि अनुष्का प्रेमानंद गोविंद शरम आश्रमात जाऊन देवाचे शुभ आशीर्वाद घेतले आहे. विराट कोहलीला 8 तारखेपर्यंत श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी हजर व्हायचे आहे. तर त्याची मुलगीवामिकाचा वाढदिवस 11 जानेवारीला आहे.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दोघेही देवाला खूप मानतात. दरम्यान, दोघांची भक्ती नीम करौली बाबांवर आहे. काही दिवसांपूर्वी हे दोघे उत्तराखंड येथील बाबांच्या आश्रमात पोहोचले होते. आता हे दोघे वृंदावनमध्ये या बाबांच्या आश्रमात गेले आहे. वृंदावनमधील या दोघांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विराट आणि अनुष्का सोबत त्यांची मुलगी वामिका देखील या फोटो आणि व्हिडिओमध्ये दिसून आले आहे.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी मुलगी वामिकासोबत नीम करौली बाबांच्या आश्रमाला आणि समाधीला भेट दिली. या जोडप्याचा वृंदावन दौऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोघे आपल्या मुलीसोबत हात जोडून देवाचे शुभाशीर्वाद घेताना दिसले आहे. या व्हिडिओमध्ये अनुष्का-विराटच्या मुलाला बघून चाहते आनंदित झाले आहे. मात्र, या व्हिडिओमध्ये देखील त्यांच्या मुलीचा चेहरा लपवला गेलेला आहे.

श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा समावेश नाही. मात्र, हे दोघे श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेमध्ये भारतीय संघात सामील आहे. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना 7 जानेवारी रोजी खेळला जाणार आहे. तर श्रीलंकेविरुद्ध 10 जानेवारीपासून एक दिवसीय सामना सुरू होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.