IPLपूर्वी विराट कोहलीला बसला धक्का !

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली त्याच्या शानदार खेळामुळे कायमच चर्चेत असतो.त्याच्या नेतृत्वाखाली इंडियन टीम आपला खेळ खेळत असते.मात्र हल्लीच झालेल्या एकदिवसीय मालिकेत लाजीरवाणा पराभव भारताला सहन करावा लागला.यादरम्यान विराटच्या आयपीएल मधील टीम RCB च्या बाबतीत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Valentine’s Day Special: रितेश-जेनेलिया घेणार राजकारणातील ‘या’ खास जोडीची मुलखात

RCB च्या ट्विटर आणि इंस्टाग्राम अकौंटवरून अचानकपणे सगळे फोटोज हटविण्यात आले आहेत. क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी याबद्दल आश्चर्य व्यक्त केले तर लेग स्पिनर आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे सदस्य युजवेंद्र चहल यांनीही ट्वीट करून यामागचे कारण विचारले. दुसरीकडे आरसीबीचे ट्विटर आणि इंस्टाग्राम हँडल ब्लॉक झाले आहेत अशी शक्यता वर्तवण्यात येत आहेत. कर्णधार विराट कोहलीनेही याबाबत ट्वीट करत आश्चर्य व्यक्त केले आहे.

शरद पवार वारकऱ्यांना दिलेला शब्द पाळण्यासाठी लागले कामाला

RCB येत्या ipl हंगामापूर्वी आपले लोगो आणि नाव बदलू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. १६ फेब्रुवारीला त्याची घोषणा देखील होईल.कदाचित त्यामुळे हे सर्व फोटोज हटवण्यात आल्याचे म्हटले जाते.आता बंगळुरूच्या संघाचे नवे नाव काय आहे हे पाहावे लागेल, यासाठी आपल्याला 16 फेब्रुवारीपर्यंत थांबावे लागेल.

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा