राष्ट्रगीत सुरू असताना केलेल्या त्या कृत्यामुळे विराट कोहली पुन्हा अडचणीत, नेमकं काय घडलं?

मुंबई : भारताचा माजी कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा वादात सापडला आहे. दक्षिण आफ्रिकेने वन डे मालिका 3-0 ने जिंकली आहे. रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसर्‍या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात त्याच्या एका चुकीमुळे चाहते नाराज झाले. यानंतर लोकांनी बीसीसीआयकडे विराटवर कारवाई करण्याची मागणीही केली.

राष्ट्रगीत सुरु असताना विराट कोहलीने असे काही लाजिरवाणं कृत्य केलं आहे की त्यामुळे त्याच्यावर जोरदार टीका केली जात आहे. विराट कोहलीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून यावर नेटीझन्स संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

झालं असं कि, तिसरा सामना खेळण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरली. सुरवातीला राष्ट्रगीत सुरु असताना टीम इंडियाचे सर्व खेळाडून राष्ट्रगीत म्हणण्यात मग्न आहेत. पण विराट कोहली राष्ट्रगीत सुरु असताना च्युइंगम चघळण्यात व्यग्र आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावरुनच विराट चागंला ट्रोल झाला आहे. त्याचे हे कृत्य अतिशय लाजिरवाणं असून नेटकरी संतप्त झाले आहेत.

 

 

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा