क्रिकेटच्या एका मॅचमध्ये तब्बल १७ किमी धावतो विराट कोहली !

भारतीय क्रिकेट संघ आपली कामगिरी अगदी उत्तमरीत्या पार पडताना दिसत आहे.सध्या या क्रिकेटसंघाचे नेतृत्व कपातून विराट कोहली करत आहे. विराट हा जगातील सर्वात तंदरुस्त आणि फिट खेळाडू आहे.जगातील निवडक चपळ क्षेत्ररक्षकांमध्ये त्याचा समावेश होतो.

… आणि कॅप्टन कोहलीला आठवेना ‘हि’ महत्त्वाची नावे  !

तंदुरुस्त खेळाडूंना क्षेत्ररक्षण करताना जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. त्यामुळं कोहली मैदानात खेळत नसेल तेव्हाही तंदुरुस्तीवरही लक्ष केंद्रित करतो. विराटची फिटनेस पातळी जगातील दोन सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू पोर्तुगालचे क्रिस्टियानो रोनाल्डो आणि अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सीसारखी आहे.टीम इंडियाचे निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी विराटच्या फिटनेसचे कौतुक केले.

अनोखी ऑफर : जिओमध्ये नंबर पोर्ट करा आणि मिळवा अर्धा किलो चिकन फ्री !

जेव्हा कोहली सामन्यात चांगला डाव खेळतो तेव्हा तो सरासरी 17 किमी धावतो तर एक फुटबॉलर 8 ते 13 किमीच्या सरासरीने धावतात. कोहली रोनाल्डो आणि मेस्सीपेक्षा दुप्पट वेगाने धावतो. रोनाल्डो 90 मिनिटांच्या सामन्यात 8.30 किमी धावतो तर मेस्सी 7.6 किमी. तंदुरुस्तीशिवाय कोहली संघाच्या क्षेत्ररक्षणावरही खूप भर देतो. आज टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण हा जगातील सर्वोत्तम संघांपैकी एक आहे.

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा