विराटच्या अनुष्काला लागली आहे ‘ही’ विचित्र सवय

अभिनेत्री ‘झिरो’ या चित्रपटात अखेरची दिसली होती. तेव्हापासून तिचा एकही सिनेमा प्रदर्शित झालेला नाही. अर्थात असे असले तरी या ना त्या कारणाने ती सतत चर्चेत असते. कधी पती विराट कोहलीसोबतच्या रोमॅन्टिक फोटोंमुळे तर कधी त्याच्या सोबतच्या व्हॅकेशनमुळे. मात्र सध्या अनुष्का एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. होय, अनुष्काला एक विचित्र सवय जडली आहे.

अनुष्काने नुकताच इन्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत तिने तिच्या विचित्र सवयीबद्दल सांगितले आहे. सध्या हा व्हिडीओ वेगाने होत आहे. या व्हिडीओत अनुष्का काम करताना अनेकदा जांभई देताना दिसत आहे.

ती वारंवार जांभई देतेय. पण ‘काम करताना मी कधीच जांभई देत नाही,अजिबात नाही…’ असे मजेशीर कॅप्शन तिने या व्हिडीओला दिले आहे. व्हिडीओमध्ये बॅकग्राउंड म्युझिक म्हणून वेस्टर्न म्युझिक वापरण्यात आले आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनीही मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.