विराट कोहलीचा हॉटेल रुममधील फोटो तुफान व्हायरल; पहा काय आहे त्याच्यासोबत!

मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहली आयपीएल २०२२ खेळण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे. कोहली नुकताच आरसीबीच्या कॅम्पमध्ये पोहोचला आहे. मंगळवारी ३३ वर्षीय कोहलीने आरसीबी किटसोबतचा स्वतःचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. विराटचा हा फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कोहलीचे चाहते फोटोवर कमेंट करून आयपीएलच्या १५व्या हंगामासाठी त्याचे अभिनंदन करत आहेत. विराटने ९ वर्षे आरसीबीचे नेतृत्व केले. मात्र, यादरम्यान त्याला संघाला विजेतेपद मिळवून देता आले नाही.

कोहलीने त्याच्या ट्विटर हँडलवर हा फोटो शेअर करत लिहिले की, तो आयपीएलबद्दल खूप उत्सुक आहे. यंदा आरसीबीचे नेतृत्व दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस करणार आहे. डु प्लेसिसला आरसीबीचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. आयपीएलच्या १४व्या हंगामानंतर कोहलीने संघाचे कर्णधारपद सोडले.

विराट सोमवारी आरसीबीच्या कॅम्पमध्ये पोहोचला. फ्रेंचायझीने त्याच्या ट्विटर हँडलवर विराटचे स्वागत केले. आयपीएलच्या आगामी हंगामात आरसीबीचा पहिला सामना पंजाब किंग्ज विरुद्ध २७ मार्च रोजी होणार आहे. दोन्ही संघांचे कर्णधार नवीन आहेत. पंजाबची कमान मयंक अग्रवालच्या हाती आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा