InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

विश्व हिंदू परिषदेच्या शोभा यात्रेत एअर रायफल, तलवारी

पिंपरी-चिंचवड शहरात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या शोभायात्रेत चार मुलींच्या हातामध्ये एअर रायफल होत्या. मुलींनी एयर रायफलचे ट्रिगर दाबून आवाज केले.

तसेच पाच मुलींनी विना परवाना तलवार मिरवल्या. या प्रकरणी निगडीपोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा प्रकार रविवारी सायंकाळी पाच ते रात्री दहाच्या दरम्यान अकुंश चौक ते ठाकरे मैदान निगडी दरम्यान घडला.

या प्रकरणी पोलिस शिपाई विकास दुधे यांनी फिर्याद दिली आहे. तर शरद इनामदार, धनाजी शिंदे, नितिन वाटकर व इतर २५० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास निगडी पोलीस करत आहेत.

निधी चौधरी यांच्यावर कारवाई करा- शरद पवार

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.