Vishwajeet Kadam | “महाराष्ट्राला लागलेलं ग्रहण घालवण्याची गरज आहे”, विश्वजीत कदमांचा भाजपला टोला

Vishwajeet Kadam | सांगली : कडेगाव तालुक्यातल्या देवराष्ट्रे येथे माजी कृषी राज्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो रॅली निमित्ताने कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांनी भाजप (BJP) पक्षावर जोरदार टोला लगावला आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री सतेज पाटील, काँग्रेसचे नेते भाई जगताप यांच्या सह जिल्ह्यातल्या काँग्रेस नेत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

या कार्यक्रमात विश्वजीत कदम बोलत असताना, महाराष्ट्रातलं ग्रहण आणि देशाला लागलेलं ग्रहण महाराष्ट्राच्या मातीतून घालवण्याची आवश्यकता आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. काल असलेल्या सुर्यग्रहण वरुन त्यांनी ही फटकेबाजी केली आहे.

यादरम्यान, मला कोणीतरी सांगितलं की आज सूर्यग्रहण आहे. पण मी म्हणालो मला त्याची फिकीर नाही, कारण देशाला आणि महाराष्ट्राला लागलेलं ग्रहण हे आपल्या मातीतून घालवण्याची आवश्यकता आहे, असं विश्वजीत कदम म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.