विश्वास नांगरे पाटलांचा टोईंग वाहनांबाबत मोठा निर्णय

विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी आणि चारचाकी पार्क केल्या जातात. यासाठी पोलिसांकडून वाहनांवर दंडात्मक कारवाईसाठी वाहन टोईंगसाठी खास ठेका देण्यात आला होता. मात्र नागरिकांचा रोष आणि नियमांची होणारी पायमल्ली बघता नाशिकमधील वाहन टोईंगला पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी स्थगिती दिली आहे.

नाशिक शहरात विविध भागात पार्किंग नसल्याने मिळेल त्या ठिकाणी वाहन पार्किंग केली जातात. यामुळे मोठ्या प्रमाणात दुचाकी आणि चारचाकी यांची टोईंग केली जात होती. याचवेळी पोलिसांकडून वाहनांवर दंडात्मक कारवाईसाठी वाहन टोईंगसाठी खास ठेका देण्यात आला होता.

टोईंग करणाऱ्या ठेकेदाराला याबाबत विशिष्ट नियमावली ठरवून दिली होती. मात्र ठेकेदार या नियमांचं पालन करत नसल्याने नाशिक पोलिसांना नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागत होते.

Loading...

या कारवाईमुळे अनेकदा नाशिक पोलिसांचे आणि नागरिकांचे व्हिडीओही व्हायरल झाले होते. पोलिसांनी वारंवार टोईंगकडे लक्ष देऊनही यात कोणतीही सुधारणा होत नव्हती. म्हणून नाशिक पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी टोईंगलाच  स्थगिती दिली. तसेच येत्या काळात वाहतूक शिस्त बघून निर्णय घेतला जाईल अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. या स्थगितीमुळे ऐन सणासुदीच्या काळात वाहतुकीचे नियोजन करण्याचे आणि वाहतूक कोंडी सोडवण्याचे आव्हान पोलिसांपुढे असणार आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.