“महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या व्यक्तिला विठ्ठल माफ करणार नाही”

मुंबई : आज संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी पंढरपूरकडे रवाना झाली. मागिल वर्षीप्रमाणे याही वर्षी राज्य सरकारने कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता वारीला परवानगी दिली नाही. यानंतर आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये होणाऱ्या विठुरायाच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री रवाना झाले आहेत. पाऊस असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी गाडीने पंढरपूरला जाण्याचा निर्णय घेतला आहे.

यावेळी उद्धव ठाकरे पंढरपूरला निघाले असून ते स्वत: गाडी चालवत आहेत तर त्यांच्यासोबत रश्मी ठाकरेही आहेत. याचाच धागा पकडत भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं आहे. विठ्ठलाची कितीही सेवा केली तरी या मुख्यमंत्र्याला विठ्ठल माफ करणार नाही कारण इतक्या सहज पणे महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या व्यक्तीला माफी नाही, असं म्हणत निलेश राणेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

दरम्यान, जो माणूस महाराष्ट्र हातात येऊन चालू शकला नाही तो माणूस गाडी चालवत मुंबईबाहेर गेला तर त्यात काय मोठा पराक्रम?, असंही निलेश राणेंनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा