InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Breaking- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामाचा ‘ले पंगा’ ५ आॅक्टोबरपासून…

- Advertisement -

मशाल स्पोर्ट्सने प्रो कबड्डी २०१८च्या हंगामाची तारीख घोषीत केली आहे. ५ आॅक्टोबर २०१८ला या हंगामाचा उद्धाटनाचा सामना होणार असून अंतिम सामना ५ जानेवारी २०१९ला होणार आहे.

लीगच्या ५व्या हंगामात जो फाॅरमॅट होता त्यानेच ही स्पर्धा खेळवली जाणार असून एकूण १३ आठवडे ही स्पर्धा चालणार आहे. गेल्या हंगामाप्रमाणेच या हंगामातही १२ संघ भाग घेत असून एकुण १३८ सामने होणार आहे.

Loading...

गेल्या हंगामात ही स्पर्धा ३१३ मिलीयन क्रीडाप्रेमींनी पाहिली होती. तसेच तब्बल १०० बिलीयन मिनीट स्पर्धा या चाहत्यांनी पाहिली होती. तसेच अंतिम सामना कोणत्याही क्रिकेटेतर सामन्यातील सर्वाधिक पाहिलेला सामना ठरला होता.

या काळात स्पर्धा घेण्याचे मुख्य कारण म्हणजे स्पर्धेला लाभणारा प्रेक्षकवर्ग. या काळात भारतात मोठ्या प्रमाणावर सण उत्सव असतात. यामुळे मोठ्या प्रमाणात प्रेक्षक स्पर्धेला लाभतात. तसेच या काळात सर्व टाॅप खेळाडू लीगसाठी उपलब्ध असतात.

Loading...

यावेळी कबड्डीप्रेमी या स्पर्धेचा आनंद प्रत्यक्ष मैदानात, स्टार स्पोर्ट्सवर आणि हाॅटस्टारवर घेऊ शकतात.

यावेळी प्रथमच प्रो कबड्डीमध्ये खेळाडूंना १ कोटीपेक्षा जास्त रक्कम मिळाली. मोनु गोयात, राहुल चौधरी, दिपक निवास हुडा, नितीन तोमर, रिशांक देवाडीगा आणि फैजल अत्राचली हे ६ खेळाडू करोडपती झाले. यातील सर्व भारतीय खेळाडू नुकत्याच झालेल्या कबड्डी मास्टर्स स्पर्धेत खेळले तसेच एशियन गेम्ससाठी टीम इंडियाचही निवडले गेले आहेत.

त्यात यावर्षी एशियन गेम्स होत असल्यामुळे देशात कबड्डीसाठी मोठे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

त्यामुळे प्रो कबड्डीचा ६वा हंगाम हा आजपर्यंतचा सर्वात हिट हंगाम ठरणार असल्याचे अंदाज आतापासूनच बांधले जात आहेत.

कबड्डीमधील ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा कबड्डीसाठीचे देशातील सर्वात लोकप्रिय आणि नंबर १चे वेबपोर्टल महा स्पोर्ट्स. तसेच आम्हाला फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फाॅलो करायला विसरु नका.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या-

-वाढदिवस विशेष- बर्थडे बाॅय जेम्स अॅंडरसनबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी

-खेळात मैत्री नाहीच! आयपीएलमधील मैत्री विसरुन हा खेळाडू आता काढणार भारतीय गोलंदाजांची पिसे

वाढदिवस विशेष-आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच जितेश शिरवाडकर यांची खास मुलाखत

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.