रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी बजावला मतदानाचा हक्क

- Advertisement -
संपूर्ण महाराष्ट्रातील मतदार, उमेदवार आणि राजकीय दिग्गज ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत, तो लोकशाहीच्या महाउत्सवाचा दिवस अखेर उजाडला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे, तर येत्या 24 तारखेला निवडणुकांचे निकाल हाती येतील. प्रचारतोफा थंडावल्यानंतर उमेदवारांची वाढलेली धाकधूक शिगेला पोहचली असून 3 हजार 237 उमेदवारांचं भवितव्य मतदानयंत्रांमध्ये बंदिस्त होणार आहे.
सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ असून सायंकाळी ६ वाजेपूर्वी मतदान केंद्राबाहेरील मतदान रांगेत उभ्या असणाऱ्या मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येईल. परिणामी अधिकाधिक मतदारांनी मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. राज्यभरात मतदानाला सुरवात झाली असून लातूर मध्ये जेनेलिया देशमुख आणि रितेश देशमुख यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. संपूर्ण देशमुख कुटुंबाने मतदानाचा हक्क बजावला आहे.
Loading...
Related Posts
- Advertisement -
आमीर खानची पत्नी किरण राव यांनी बजावला मतदानाचा हक्क @inshortsmarathi https://t.co/bXM1BQYKkg
— InShorts | मराठी (@InshortsMarathi) October 21, 2019
Loading...