InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

वंचित बहुजन आघाडी स्वबळावर विधानसभा लढणार – प्रकाश आंबेडकर

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रातील सर्व 48 जागांवर आपले उमेदवार उतरवले होते. आता विधानसभा निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे लढणार आहे, असे प्रकाश आबंडेकर यांनी स्पष्ट केले आहे.

लोकसभा निवडणुकीतही प्रकाश आंबेडकरांनी स्वतंत्र निवडणूक लढवली होती. कॉंग्रेस-राष्ट्रवादीने वंचित बहुजन आघाडीला महाआघाडीत घेण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र ते सर्व अपयशी ठरले. प्रकाश आंबेडकर म्हणाले, लोकसभेप्रमाणेच आम्ही विधानसभा निवडणुकीत कुणासोबतही जाणार नाही. विधानसभेत सर्व जागांवर वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढणार असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply