InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मतदान जागृतीसाठी दिंडोरी तालुक्यात भव्य मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन

निवडणुकीत सातत्याने कमी मतदान होत असल्याने, भारतीय मानवाधिकार परिषदेच्या वतीने मतदार जनजागृती अभियान हाती घेण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मतदार संघाच्या विकासासाठी चांगले काम करणारे प्रतिनिधी निवडून देण्यासाठी तसेच मतदारांमध्ये मतदानाची जागृती करण्यासाठी दिंडोरी तालुक्यात भव्य मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

या रॅलीचा शुभारंभ शिवाजी महाराज आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. यावेळी मानवाधिकार परिषदेचे हाजी शेख, नितीन भुजबळ, संतोष धात्रक, त्रंबक गांगुर्डे, प्रविण निकम, महेंद्र गांगुर्डे हे उपस्थित होते. दिंडोरीतील नगर पंचायतीच्या बाजार पंटगणातून रॅलीला सुरूवात करण्यात आली. या रॅलीमध्ये शाळा, काॅलेजमधील विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, गावातील लोकांनी उत्साहाने सहभाग घेतला. मतदानाचा हक्क बजावणे आपले कर्तव्य असून, मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply