InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘दादा, हे बघा तुम्हालाच मत’; कार्यकर्त्यांचा मतदानावेळी फेसबूक लाईव्हचा प्रताप

उस्मानाबादच्या एका तरुणाने फेसबूक लाईव्ह करत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान केल्याचे पोस्ट केले आहे. हा तरुण राष्ट्रवादीच्या विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता आहे. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

हे फोटो फेसबुकवर टाकताना ‘दादा तुमचा विजय निश्चित’, ‘दादा तुम्हीच’ असे उल्लेख केले आहेत. तर उस्मानाबादच्या या तरुणाने ‘माझं मत सिंहाच्या छाव्याला’ म्हणत फेसबूक लाईव्ह केले होते. मात्र, अडचणीत येतो असे समजल्यावर त्याने हा लाईव्ह व्हिडिओ डिलिट केला आहे.

तर परभणी मतदारसंघात मतदारांनी कोणाला मतदान केले याचे पुरावेच त्या त्या पक्षांच्या उमेदवारांना पाठविल्याने निवडणूक कर्मचारीही हैराण झाले आहेत.

मतदान केंद्रामध्ये मोबाईल नेण्यास व चित्रिकरण करण्यावर बंदी असतानाही मतदान करतानाचा फोटो, व्हिडिओ काढून मतदारांनी ते उमेदवारांना पाठविला असल्याचा प्रकार घडताना दिसत आहे. त्यामुळे या प्रकारामुळे गुप्त मतदान करण्याच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply