‘प. बंगाल मध्ये होणाऱ्या हिंसा या राजकीय पक्षाविरोधात नाही, तर हिंदूना संदेश देणाऱ्या घटना’

मुंबई : राज्यात विधानसभेची निवडणूक संपताच राजकीय हिंसाचाराची मालिका सुरू झाली आहे. दरम्यान, निकालाच्या दिवशीच कोलकातामधील भाजपा कार्यालयाला आग लावण्यात आली होती. तर सोमवारी पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांना मारहाण करत हत्या केल्याची बातमी समोर आली होती.

मात्र आता निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफळल्याचं दिसून येत आहे. कालपासून सुरु झालेल्या या हिंसाचारामध्ये कालपासून ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या मिळत आहे. हा हिंसाचार तृणमूल कॉंग्रेसने घडवून आणली असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलेला आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट केलं आहे. ‘प. बंगाल मध्ये होणाऱ्या हिंसा या एका राजकीय पक्षा विरोधात नाही…तर हिंदूना एक संदेश देणाऱ्या घटना आहेत. ६५ टक्के विभाजित समाजाला सहजपणे हरवू शकतो.आज प.बंगाल… उद्या हिंदुस्तान ??’ असं नितेश राणे म्हणाले आहेत.

दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी बंगालमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला असून कार्यकर्त्यांचे हौतात्म्य वाया जाऊ देणार नाही, असं म्हणत हिंसेचा निषेध केला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.