‘ए तु थांब रे! मधे बोलू नको’; नारायण राणेंनी दरेकरांना भरला दम

मुंबई : मागील आठवड्यात मुसळधार पावसामुळे सातारा, सांगली, रत्नागिरी, रायगड, ठाणे, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यात पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली होती. तर काही ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना देखील घडल्या. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चिपळूण दौरा केला होता. यावेळी राणेंनी हे आपल्याच पक्षातील एका मोठ्या नेत्यावर म्हणजेच प्रवीण दरेकरांवर चिडलेले दिसले.

चिपळूण दौऱ्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे देखील होते. यावेळी राणेंनी जिल्हाधिकारी उपस्थित नसल्याने अधिकऱ्यांना फैलावर घेतलं. त्यावेळेस नारायण राणे अधिकाऱ्यांशी बोलत असताना प्रविण दरेकर मधे बोलले. त्यामुळे नारायण राणे यांनी दरेकरांना दम भरला.

“तुम्हाला सोडू का? तुम्हाला माॅबमध्ये सोडू का? अशा सवाल नारायण राणे यांनी अधिकाऱ्यांना विचारला. त्यावेळी प्रविण दरेकर मधे काहीतरी बोलले. त्यावर नारायण राणे यांनी दरेकरांना झापलं. ‘ए तु थांब रे…! मध्ये बोलू नको, असं नारायण राणे दरेकरांना म्हणाले. ही काय चेष्टा समजली, लोकांच्या डोळ्यात अश्रू आहेत. लोक रडतात. त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय आणि तुम्ही हसतायेत आणि दात काढताय,” असं राणे अधिकाऱ्यांना म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा