“थोडं थांबा… दिवाळीनंतर राज्यात आपलंच सरकार येणार आहे”; सुजय विखेंचा दावा

अहमदनगर : राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून विरोधी पक्षाकडून नेहमी सांगण्यात येतंय कि, महाविकासाआघाडी सरकार कोसळणार. तसेच सत्ताधारी आणि विरोधी पक्षात सतत शाब्दिक युद्ध चालू असतात. आरोप प्रत्यारोप सुरु असतात. यानंतर आता भाजपा खासदार सुजय विखे-पाटील यांनी अहमदनगरच्या कर्जत येथील एका कार्यक्रमात मोठं वक्तव्य केलय.

थोडं थांबा. दिवाळीनंतर आपलंच सरकार येणार आहे, असा दावा त्यांनी केला. त्यानंतर मात्र त्यांनी घुमजाव केलं. कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी मी तसं विधान केलं, अशी सारवासारव त्यांनी केली आहे. यापुढेही असं बोलत राहू असही ते म्हणाले. केंद्र सरकारच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी ते कर्जत दौऱ्यावर होते. त्यावेळी ते कार्यकर्त्यांशी बोलतांना दिवाळी नंतर राज्यात भाजप सरकार येईल असा दावा केला होता.

कर्जत आणि जामखेड या दोन्ही नगरपालिकांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्या अनुषंगाने राम शिंदे आणि सुजय विखे पाटील हे सध्या या भागात सातत्यानं बैठका घेत आहेत. त्यांनी केंद्र सरकारच्या योजनांचा आढावा घेतला त्याचबरोबर लसीकरण केंद्राला भेटी दिल्या. या भागातील लसीकरणाची परिस्थिती जाणून घेतली. यावेळी या दोघांनीही राजकीय फटकेबाजी केल्याचं पहायला मिळालं.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा