InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मध्यस्थांच्या अहवालाची वाट पाहू, अन्यथा २५ जुलैपासून सुनावणी- सुप्रीम कोर्ट

रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमिनीच्या वादावर गुरुवारी म्हणजेच आज सुनावणी झाली. या दरम्यान या वादातून तोडगा काढण्यासाठी आम्ही मध्यस्थांची समिती नेमली आहे. या समितीने आपला अहवाल सादर करावा अन्यथा २५ जुलैपासून सुनावणीला सुरुवात होईल असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. मध्यस्थ नेमण्याचा जो निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला होता. मात्र मध्यस्थांच्या समितीकडून या प्रश्नावर जो तोडगा काढला होता त्याने कुणाचेही समाधान झालेले नाही असे याचिकाकर्त्यांनी म्हटले होते. मात्र आम्ही मध्यस्थांच्या समितीने अहवाल देण्याची १८ जुलैपर्यंत वाट पाहू अन्यथा २५ जुलैपासून सुनावणी घेऊ असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

मध्यस्थांच्या समितीने या प्रकरणावरचा अहवाल कोर्टापुढे येत्या गुरुवारपर्यंत म्हणजेच १८ जुलैपर्यंत सादर करावा असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. मध्यस्थांनी अहवाल सादर केल्यानंतर तो समाधानकारक नाही असे निदर्शनास आले तर २५ जुलैनंतर रोज या प्रकरणाची सुनावणी चालेल.

महत्वाच्या बातम्या-

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply