Walnut | अक्रोडचे दररोज सेवन केल्याने त्वचेला मिळतात ‘हे’ फायदे

Walnut | टीम महाराष्ट्र देशा: अक्रोड आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण अक्रोडामध्ये भरपूर पोषक तत्वे आढळून येतात, जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. अक्रोडाचे नियमित सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहते. त्याचबरोबर अक्रोडाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. नियमित अक्रोडाचे सेवन केल्याने आरोग्यासोबतच त्वचेला (Skin Care) देखील अनेक फायदे मिळू शकतात. दररोज दोन ते तीन अक्रोडा खाल्ल्याने त्वचेला खालील फायदे मिळू शकतात.

रक्त शुद्ध राहते (The blood remains pure-Walnut For Skin)

अक्रोडामध्ये भरपूर प्रमाणात अंटीऑक्सीडेंट गुणधर्म आढळून येतात, जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतात आणि शरीरातील फ्री रॅडिकल्स मुक्त करतात. अक्रोडाचे नियमित सेवन केल्याने रक्त शुद्ध होण्यास मदत होते. परिणामी त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होतात.

त्वचा मॉइश्चराईज राहते (Skin stays moisturized-Walnut For Skin)

अक्रोडामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन बी 5 आणि विटामिन ई आढळून येते, जे त्वचेला मॉइश्चराईज  ठेवण्यास मदत करते. नियमित अक्रोडाचे सेवन केल्याने त्वचा हायड्रेट राहते आणि त्वचेला आतून पोषण मिळते.

डार्क सर्कल दूर होतात (Dark circles disappear-Walnut For Skin)

आजकालच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक दुसऱ्या व्यक्ती डाग सर्कलच्या समस्येपासून त्रस्त आहे. डार्क सर्कल्सच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही दररोज अक्रोडाचे सेवन करू शकतात. दररोज दोन ते तीन अक्रोडाचे सेवन केल्याने डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर होऊ शकतात.

नियमित अक्रोडचे सेवन केल्याने त्वचेच्या वरील समस्या दूर होऊ शकतात. त्याचबरोबर चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी तुम्ही खालील पद्धतींचा वापर करू शकतात.

बेसन आणि पपई (Besan and papaya-For Blackheads)

चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी बेसन आणि पपई उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला दोन चमचे बेसनामध्ये आवश्यकतेनुसार पपई मिसळून घ्यावी लागेल. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यानंतर तुम्हाला ते साधारण 15 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. पंधरा मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी तुम्ही आठवड्यातून तीन वेळा या मिश्रणाचा वापर करू शकतात.

बेसन आणि ग्रीन टी (Besan and green tea-For Blackheads)

बेसन आणि ग्रीन टीच्या मदतीने चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर करता येऊ शकतात. यासाठी तुम्हाला दोन चमचे बेसनामध्ये आवश्यकतेनुसार ग्रीन टी मिसळून घ्यावा लागेल. त्यानंतर हे मिश्रण तुम्हाला ब्लॅकहेड्सवर लावावे लागेल. दोन मिनिटे हलक्या हाताने स्क्रब केल्यानंतर तुम्हाला हे मिश्रण साधारण पंधरा मिनिटे चेहऱ्यावर राहू द्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाच्या मदतीने चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स सहज दूर होऊ शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

You might also like