दिशा पटनीसारखी परफेक्ट फिगर हवीय? मग फॉलो करा तिच्या डाएट टीप्स

काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या सलमान खानच्या ‘भारत’ सिनेमामध्ये दिशानं जरी छोटीशी भूमिका साकारली असली तरीही तिनं या सिनेमामध्ये तिनं काही स्टंट सुद्धा केले आहेत. पण या स्टंटसाठी तिला खूप मेहनत घ्यावी लागली. पण दिशी फिटनेस फ्रिक असल्यानं तिला हे तितकसं अवघड गेलं नाही

‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री दिशा पटानी सध्या तिच्या सिनेमांपेक्षा फिटनेसमुळे जास्त चर्चेत असते. तिच्या अभिनयासोबतच लोक तिच्या फिटनेस आणि परफेक्ट फिगरचे चाहते झाले आहेत. दिशा सुद्धा नेहमीच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिचे फिटनेस व्हिडिओ शेअर करताना दिसते.

दिशाच्या सोशल मीडिया अकाउंटवरील फोटोमधील तिचा फिटनेस पाहता सर्वांनाच नेहमीच तिच्या फिटनेस प्लान आणि डाएटविषयी जाणून घेण्याची उत्सुकता आहे.तुम्हाला पण तिच्या सारखी परफेक्ट फिगर आणि फ्लेक्सिबल बॉडी हवी असेल तर तुम्ही सुद्धा तिचा डाएट प्लान आणि वर्कआऊट फॉलो करू शकता

Loading...

स्वतःला फिट ठेवण्यासाठी दिशा नियमित व्यायाम करते. याशिवाय ती एक हेल्दी डाएट प्लान सुद्धा फॉलो करते. पण दिशा तिच्या अ‍ॅब्जबद्दल खूप जागरूक आहे आणि ते मेंटेन करण्यासाठी दिशा वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज करते.

दिशाचा डाएट प्लानसुद्धा प्रोटीन आणि विटामिन्सनी परिपूर्ण असतो. ब्रेकफास्टमध्ये ती रोज 2-3 अंडी, टोस्ट दूध किंवा ज्यूस घेते. तर लंच आणि डिनरमध्ये ताजी फळं, ज्यूस, हिरव्या भाज्यांचं सलाड, ब्राऊन राइस आणि डाळ याचा समावेश असतो. तसेच मधल्या वेळचं खाणं म्हणून ती बदाम किंवा शेंगदाणे खाते.दिशाच्या लंचमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीनयुक्त पदार्थ असतात. यात तिला चिकन आणि राइस खाणं आवडतं. याशिवाय कधी कधी ती उकडलेली अंडी सुद्धा खाते. तसेच बॉडी हायड्रेट करण्यासाठी ती भरपूर पाणी पिते.

दिशाच्या फिटनेसच्या मागचं सर्वात मोठं रहस्य म्हणजे डान्स, स्विमिंग, वेट ट्रेनिंग आणि योगा हे आहे. तिचा सिनेमा ‘कुंगफु योगा’च्या वेळी दिशानं स्क्वेअर डान्सही शिकली होती. याशिवाय दिशा आठवड्यातून 4 दिवस आणि प्रत्येक दिवसातून 2 वेळा जिमला जाते.

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.