InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

भाजपमध्ये सोशल मिडियाच्या वापरावरून ‘वाॅर’

'सीएम'नी आणला नविन 'सोशल मिडिया' फार्म्यूला

औरंगाबाद/अभय निकाळजे(वरिष्ठ पत्रकार ) : सोशल मिडियाच्या वापरामध्ये पहिल्या क्रमांकावर कोण असे जर विचारले तर कुणीही सांगेल ‘भाजप’.पण आता भाजपमध्येच सोशल मिडियाच्या वापरात नंबर एक कोण असे वाॅर सुरू आहे. त्यात सीएम नी ‘सोशल मिडिया मित्र’ नावाचा नविन फार्म्यूला आणला आहे.
आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपुर्वी हे भाजप नेत्यांमधील सोशल मिडिया वाॅर कुठपर्यंत जाईल, हे आता सांगणे कठिण आहे. पण वाॅर सुरू आहे, ते आत्ता जरी छुपे असले तरी येणाऱ्या काळात त्याचे अक्राळविक्राळ रुप पहायला मिळणार आहे. मंत्री पंकजाताई मुंडेंच्या सर्मथकांच्या दाव्यानुसार सोशल मिडियावर ताईच नंबर वन आहेत. कारण ताईचे फाॅलोअर हे त्यांचे चाहते आहेत. कुणी ‘पेड’ फाॅलोअर नाहीत. तर ‘सीएम’ नी माध्यमांवर आपली पकड असावी, म्हणून माहिती संचलनालय हाताशी असतांना एक स्वतंत्र यंत्रणा उभी केली आहे .

या यंत्रणेत काही प्रसार माध्यमांतील लोक आहेत. तर शासनाच्या सेवेत असणारे पण खासगीत फक्त सीएम ची प्रसिद्धी करणारे ‘आयएएस’ अधिकाऱ्यांचा ‘संघ’ आहे. त्यावर करोडो रुपयांचा खर्च शासन करते. त्यात आता ‘सोशल मिडिया मित्र’ ही नविन संकल्पना सीएम नी आणली. हे मित्र संपूर्ण शासनाची प्रसिद्धी करणार नाही. तर फक्त सीएम च्या बाबतीतल्या चांगल्या गोष्टी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणार आहेत. त्यामुळे विना खर्च फाॅलोअर मिळविणाऱ्या नेत्यांची अस्वस्थता वाढणे स्वाभाविक आहे. म्हणून सोशल मिडियावर वाॅर सुरू आहे. ज्या वेड्यांनी विना संकल्पना सोशल मिडिया मित्र झाले आहेत. त्यांचीही मोठी अडचण होणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply