भाजपा खासदार रामदास तडस यांच्याविरुद्ध वर्धा पोलिसांत गुन्हा दाखल

भाजपाचे खासदार रामदास तडस यांनी पत्रकार परिषदेत कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी खासदार तडस यांच्यासह आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्ध्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी आमदार रणजित कांबळे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती.

याप्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या निगरानी पथकाने दिलेल्या तक्रारीवरून वर्ध्यातील रामनगर पोलीस ठाण्यात खासदार रामदास तडस आणि आयोजक पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलं आहे

“आमदार कांबळे यांनी यापूर्वीही अनेक अधिकाऱ्यांना धमकावलं आहे. परंतु एकाही अधिकाऱ्याने तक्रार न केल्यानं कांबळेंची हिंमत वाढली. अनेक अधिकारी विनंतीवर बदली करून घेत जिल्हा सोडून गेले. मात्र, डॉ. डवले यांनी हिंमत दाखवून पोलीस तक्रार केली. या तक्रारीची तत्काळ दखल न घेतल्यास आरोग्य यंत्रणा नाराज होऊ शकते. याचा विपरित परिणाम लोकांच्या आरोग्यावर झाल्यास कांबळे हेच जबाबदार असतील. त्यामुळे कांबळे यांना अटक करावी,” अशी मागणी तडस यांनी पत्रकार परिषद घेऊन केली होती.

वर्धा जिल्ह्यातील नाचनगाव येथे ९ मे रोजी आरटीपीसीआर चाचणी आरोग्य शिबीर पार पडलं. या शिबिराची छायाचित्रं काढून स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राजकीय व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकली होती. हे फोटो दिसल्यानंतर आमदार कांबळे यांनी डॉ. डवले यांना फोन केला. फोनवरून घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली. तसेच जीव मारण्याची धमकी दिली. असा आरोप डॉ. डवले यांनी केला होता. त्यांच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी आमदार रणजित कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा