InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

विठूमाऊलीच्या दर्शनासाठी पंढरीच्या दिशेनं निघालेले वारकरी पंढरपुरात दाखल

संत तुकाराम महाराजांची पालखी आज वाखरीतून पंढरपुरात दाखल होईल. त्यामुळे तुकोबांच्या पालखीसमोर पादुका अभंग आणि शेवटचे उभे रिंगण पार पडेल. तसेच संत ज्ञानेश्वरांचीही पालखी पंढरपुरात दाखल होईल. संत ज्ञानेश्वरांच्या पालखीसमोर शेवटचे उभे रिंगण आज पार पडेल.

राज्यभरातून पंढरीच्या दिशेनं निघालेले वारकरी पंढरपुरात दाखल होत आहेत. पांडुरंगाचे दर्शन व्हावं हीच सर्व वारकऱ्यांची इच्छा असते. त्यामुळे अवघी पंढरी वारकऱ्यांनी गजबजलेली पाहायला मिळत आहे.

यंदा राज्यातील अनेक भागात समाधानकारक पावसाला सुरुवात झाल्याने आषाढीला विक्रमी गर्दीचा अंदाज व्यक्त होत आहे. विठ्ठल भक्तांची रांग सात किमीवर पोहोचली आहे. महिनाभर विविध पालख्यात चालत आलेल्या भाविकांना दर्शनासाठी तासंतास रांगेत उभं राहायलाही काहीच वाटत नाही. फक्त विठुरायाच्या पायावर मस्तक ठेऊन दर्शन घेण्याची भावना लहान थोरांची दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply