‘राज्याचं एटीएस झोपलं होतं काय?’ दहशतवादी अटक प्रकरणी भाजपचा सवाल

मुंबई : दिल्ली पोलिसांनी काल सहा दहशतवाद्यांना अटक केली अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी काही जणांनी मुंबई लोकलची रेकी केली होती. या सहा दहशतवाद्यांपैकी जान मोहम्मद शेखला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. या मुद्द्यावरून देशात वातावरण तापू लागले आहे. एकीकडे या प्रकरणी गृहमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.

मात्र दुसरीकडे भाजपाकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ‘हे दहशदवादी महाराष्ट्रात कट करत असताना राज्याचे एटीएस झोपले होते का?’ असा संतप्त सवाल भाजपाकडून ठाकरे सरकारला विचारण्यात आला आहे. राज्यात दहशतवादी मुंबईत वास्तव्य करून दहशतवादी कट करत असताना राज्याचं एटीएस एवढा वेळ झोपलं होतं काय? असा संतप्त सवाल भाजपचे आशिष शेलार यांनी केला आहे. यासंदर्भात मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी त्यांनी या दहशतवाद्यांचे प्रशिक्षण पाकिस्तानात झाले आहे. व दाऊदचा भाऊ अनिस अहमद त्यांना पैसा पुरवत होता, असं आशिष शेलार यांनी म्हटले आहे. यावरूनच शेलार यांनी ठाकरे सरकार विशिष्ट वर्गासाठी मवाळ भूमिका तर नाही घेत आहे ना? असा आरोपही त्यांनी केला आहे. या दहशतवाद्यांची माहिती पोलिसांकडे तसेच गृहमंत्र्यांकडे होती का, होती तर एवढा वेळ ते काय करीत होते? असा सवालही आशिष शेलार यांनी केला आहे.

या गंभीर विषयावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या इंटेलिजन्स फेल्युअरवर आणि इतर मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट करावी. अशी मागणीही त्यांनी केली आहे. तसेच राज्यकर्ते पोलिसांना नको त्या विषयात लक्ष घालायला लावते, तेव्हा गंभीर विषयांकडे पोलिसांचे दुर्लक्ष होते, हे सर्वांना दिसतात. सौदेबाजी, वसुलीबाजी करताना पोलिसांच्या डोक्यावर मिऱ्या वाटाव्यात असे राज्य सरकार वागते, तेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते. असे देखील शेलार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा