बाबरी मस्जिद पाडण्यासाठी एक तरी शिवसैनिक होता का?; पाटलांचा ठाकरेंवर पलटवार

कोल्हापुर : शिवसेना दसरा मेळावा होणार आहे, यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. या मेळाव्यातल मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार, याची उत्सुकताही सर्वांना लागून राहिली होता. अखेर उद्धव ठाकरे यांनी भाजपावर थेट निशाणा साधला आहे. शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा षण्मुखानंद सभागृहात काल पार पडला.

यावेळी ठाकरे म्हणाले कि, १९९२ च्या बाबरी मशीद पाडली तेव्हा कोणी जबाबदारी स्वीकारली होती ? बाकीचे सर्व बिळात लपले होते. फक्त एकच व्यक्तीने या गोष्टीची जबाबदारी स्वीकारली होती ते होते हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असे ते म्हणाले. हिंदुत्व धोक्यात आहे ते परक्यांपासुन नाही तर ह्या नवहिंदुंपासुन आहे असं ते म्हणाले.

यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट कोल्हापुरात पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मस्जिद पाडण्यासाठी एक तरी शिवसैनिक होता का? असा सवाल केला आहे. तसेच राम मंदीर तुम्ही बांधलं का? असाही सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा