बेकरीत काम करण्यापासून ते बॉलीवूडपर्यंत सनीच्या आयुष्याचा प्रवास पहा

सनी लिओनचेे खरे नाव करणजीत कौर आहे. 13 मे 1982 रोजी सनीचा झाला असून आज सनीचा वाढदिवस असतो. खरेतर सनी लिओनच्या कामाबद्दल सगळ्यांना माहीत आहे, पण मात्र तिच्या या यशाबद्दल तिला जो स्ट्रगल करावा लागला, त्याबद्दल खूप कमी लोकांना माहीती आहे.

आत्ता हे ऐकले तर आश्चर्य वाटेल पण एका काळात सनीने एका जर्मन बेकरीत काम केले. सनीची एक मैत्रिण होती. तिनेच लोकप्रिय अ‍ॅडल्ट मॅगझिन ‘पेंट हॉऊस’च्या एका फोटोग्राफरशी सनीची भेट करून दिली. ही भेट सनीला पॉर्न इंडस्ट्रीत घेऊन आली. आणि सनी करिअर करण्यासाठी करणजीत वरून सनी बनली.

सनीने मे २००७ मध्ये सहा अ‍ॅॅडल्ट सिनेमे केले. यासाठी तिने एक अट ठेवली होती. तिच्या सर्वच पॉर्न सिनेमांमध्ये तिचा बॉयफ्रेन्ड मेट तिच्यासोबत असेल. त्यावेळी केवळ मेटसोबत तिने अ‍ॅडल्ट काम केले होते. 2008 मध्ये त्याचे आणि सनीचे ब्रेकअप झाले. सनीने मेटसोबत काम करण्यास नकार दिला. मेट त्यामुळे चांगलाच नाराज झाला होता. त्यामुळे संतापून त्याने सनीचे आणि त्याचे काही प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल केले होते. त्यानंतर सनीने 2011 मध्ये 3 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर डॅनिअल वेबरसोबत लग्न केले.

मात्र लग्नानंतर सनीच्या आयुष्यात बराचसा बदल झाला. तिच्या पतीला तिनं पॉर्नस्टार म्हणून काम करू नये अशी इच्छा होती पण त्याने ते थेट कधी सांगितले नाही. पण नंतर हे सनीला कळून आले त्यामुळे प्रेमासाठी सनीने पॉर्न व्हिडिओमध्ये काम करायला कायमचा नकार दिला. पॉर्नस्टार असल्यामुळं अनेकजण तिच्यासोबत काम करण्यास नकार देतात पण सनीला याचा काहीही फरक पडत नाही.

तिच्या मते ती लहानपणापासून संघर्ष करते आणि त्याची आता सवय झाली आहे. तर अशा प्रकारे सनी लिओनीने आपल्या पतीसाठी पॉर्न इंडस्ट्री सोडली आणि लहानपणापासूनची इच्छा पूर्ण करण्यासाठी ती बॉलिवूडमध्ये आली. सोशल मीडियावर ‘मोस्ट सर्च्ड पीपल’च्या यादीत स्थान मिळवणारी सनी सुमारे 82.20 कोटींच्या संपत्तीची मालकीन आहे. चित्रपटासाठी सनी 4.5 कोटी रुपये घेते.

 

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा