InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

जुनी पेन्शन योजनेसाठी वर्ध्यात जलसमर्पण आंदोलन

- Advertisement -

देऊरवाडा येथील वर्धा नदीच्या पात्रात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन व शिक्षक महासंघाच्या वतीने जुनी पेन्शन योजना कार्यन्वित करण्याच्या एकमुखी मागणीला घेऊन जलसमर्पण आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये वर्धा, नागपूर, अमरावती जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

महाराष्ट्र शासनाने ३१ ऑक्टोबर २००५ च्या अधिसूचनेनुसार शासनाच्या सेवेत दिनांक १ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना म.रा.ना.से अधिनियम १९८२ व १९८४ अंतर्गत निवृत्ती वेतन योजना बंद करून पारिभाषिक अंशादाई पेन्शन योजना सुरू केली आहे. १९८२ व ८४ ची जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी महाराष्ट्र जुनी पेन्शन हक्क संघटनेने अनेकदा आंदोलने केली आहे.

आंदोलनाची दखल घेत आर्वी विधानसभेचे आमदार अमरभाऊ काळे घटनास्थळी दाखल झाले व सर्व आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली व येत्या पावसाळी अधिवेशनात जुन्या पेन्शनचा जागर हा विधानभवनात केला जाईल जेणेकरून या सरकार जाग येईल असे सूचक वक्तव्य त्यांनी उपस्थितांसमोर केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.