InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

मराठवाड्यासाठी कोकणातून येणार पाणी; मंत्रिमंडळाचा निर्णय

मराठवाड्यात कोकणातील अतिरिक्त पाणी वळवून मराठवाड्याला दिलासा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिमवाहिनी नदी खोऱ्यातून मराठवाड्यात पाणी वळवण्यासाठी प्रस्तावित नदीजोड प्रकल्पाला चर्चेअंती तत्त्वत: मान्यता दिली. जलसंपदा विभागाने आज मंत्रिमंडळासमोर या प्रकल्पाचे सादरीकरण केलं.

यावेळी हा निर्णय घेण्यात आला.मराठवाड्यात पाण्याची नैसर्गिक उपलब्धता कमी असल्याने कोकणातील अतिरिक्त पाणी वळविणे हाच पर्याय उपलब्ध आहे. त्यासाठी सविस्तर सर्वेक्षणाअंती आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरणाऱ्या योजनांना मान्यता देऊन त्यांची कामे सुरू करण्याचा निर्णय झाला.

Loading...

कोकणातील नार-पार, दमणगंगा, उल्हास व वैतरणा या खोऱ्यांलगत असलेल्या मराठवाड्यातील गोदावरी नदी खोऱ्यातील पुणे, गंगापूर, वाघाड, करंजवण, भंडारदरा, मुळा, कडवा, मुखणे, भावली इत्यादी धरणांच्या पाणलोट खोऱ्यात हे पाणी वळवता येईल.

महत्वाच्या बातम्या-

- Advertisement -

Loading...
You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.