‘आम्ही बिळातून नव्हे तर दिल्लीच्या मुख्य दरवाजाने मानाने जातो’

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे वाहू लागले आहेत. यातच राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दिलीप सोपल शिवसेनेत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसने बोलावलेली महत्त्वाची बैठक टाळून आ. सोपल यांनी आपल्या समर्थकांचा मेळावा घेतल्याने त्यांच्या शिवसेनेत प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

माझा जनतेशी कायम संवाद सुरू असतो. हा संवाद चार पिढ्यांबरोबर सुरू  आहे. माझ्या डोक्यातील संभ्रम मला अवस्थ करू लागला आहे. तालुका हेच माझे कुटुंब झाले आहे. ज्यावेळी पक्षाने उमेदवारी नाकारली त्यावेळी लोकांत संताप निर्माण होऊन मला अपक्ष आमदार केले. २०१४ च्या लाटेतही मला निवडून दिले. आम्ही बिळातून नव्हे तर दिल्लीच्या मुख्य दरवाजाने मानाने जातो. तुमचा प्रतिसाद पाहून एक निर्णय ठामपणे घेण्याची वेळ आली आहे, असे सांगत आमदार दिलीप सोपल यांनी शिवसेना प्रवेशाचे सूतोवाच केले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले दिलीप सोपल शिवसेनेत गेल्यास सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असणार आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.