आम्हाला त्यांच्याबरोबर जाण्यात रस नाही – प्रकाश आंबेडकर

‘लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसबरोबर युती व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न केले. पण 3 ते 4 महिने त्यांनी आम्हाला खेळवत ठेवलं. आताही काँग्रेसच्या वागणुकीत काही फरक पडलेला नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आम्ही काँग्रेससोबत युती करणार नाही,’ अशी मोठी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

‘काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे यांच्याबरोबर वंचित बहुजन आघाडीची बैठक झाली. आम्ही त्यांना प्रस्तावही दिला. मात्र त्या प्रस्तावाचं अजूनही उत्तर आलेलं नाही. आता आम्हाला त्यांच्याबरोबर जाण्यात रस नाही,’ असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीच्या चर्चेची दारं बंद केली आहेत.

Loading...
महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.