InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

महाआघाडीच भाजपला रोखू शकते; त्यासाठी आम्ही चार पावले मागे येण्यास तयार – अखिलेश यादव

- Advertisement -

२०१९ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी उत्तर प्रदेशात महाआघाडीची चर्चा सुरु झाली आहे. उत्तर प्रदेशेचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी महाआघाडीसाठी सकारात्मक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. या महाआघाडीत सपा, बसपा, काँग्रेस आणि आरएलडी असतील, असे चार पक्ष असण्याची शक्यता असून, हे चार पक्ष मिळून उत्तर प्रदेशात भाजपला टक्कर देण्याची शक्यता आहे.

बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी रविवारी म्हटले की, महाआघाडी तेव्हाच बनेल, जेव्हा बसपाला सन्मानपूर्वक जागा दिल्या जातील. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मात्र महाआघाडी होण्याच्या दृष्टीने सकारात्मक विधान केले आहे. ते म्हणाले, महाआघाडीच उत्तर प्रदेशात भाजपला रोखू शकते. त्यामुळे भले आम्हाला दोन-चार पावलं मागे यावं लागलं तरी चालेल.

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.