InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

आम्ही वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडण्यास तयार – ओवेसी

काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एमआयएम नको असेल, तर वंचित बहुजन विकास आघाडीतून एमआयएम बाहेर पडायला तयार असल्याचं वक्तव्य एमआयएमचे खासदार असदुद्दीनं ओवेसी यांनी केलं आहे. नांदेडमध्ये बहुजन वंचित विकास आघाडीच्या सभेत ओवेसी बोलत होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर सडकून टीका केली.

एमआयएमला सोबत घेण्यास काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध आहे. याविषयी बोलताना ओवेसी म्हणाले की, एमआयएम नको असेल तर मी आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे. ते पुढे म्हणाले,”तुम्ही प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोला, त्यांना हव्या तितक्या जागा द्या. मी एकही जागा लढवणार नाही. वंचित बहुजन आघाडीच्या व्यासपीठावरही येणार नाही. मात्र प्रकाश आंबेडकर यांच्या अटी मान्य करा आणि आघाडी करा. प्रकाश आंबेडकर यांच्या अटी मान्य केल्यास मी स्वतंत्र सभा घेऊन आघाडीचं स्वागत करेन”, असं खुलं आव्हान असदुद्दीन ओवेसी यांनी दिलं.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply