उद्धव ठाकरेंच्या सल्ल्याने आलो, अजितदादा तुमच्या आमदाराला वेसण घाला!

पुणे : महाविकासआघाडीतील ३ पक्षांपैकी २ पक्षांत वादाची ठिणगी पडल्याचं दिसून येत आहे. खेड पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीचा वाद अखेर पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचला आहे. शिवसेनेचे विद्यमान सभापती भगवान पोखरकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांच्या गटातील वाद आता थेट पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचला आहे.

या प्रकरणाची दखल घेऊन शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज (४ जून) खेडमध्ये दाखल झाले. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांच्यावर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये चांगले संबंध आहेत.

मात्र, खेडमध्ये पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी आमदार दिलीप मोहिते यांच्याकडून घाणेरडे राजकारण सुरु आहे, असा आरोप राऊतांनी केला. तसेच आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सल्ल्यानुसार खेडमध्ये आलो आहोत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या आमदाराला वेसण घालावे, असा सल्ला राऊत यांनी यावेळी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा