InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

बहुमताचा आकडा भाजपने सहाव्या टप्प्यातच गाठला आहे – अमित शाह

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी भाजपने लोकसभेसाठी आवश्यक असलेला बहुमताचा आकडा सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतरच गाठला असल्याची विश्वास व्यक्त केला आहे.’सातव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर भाजपा ३०० जागांचा टप्पा पार करेल, असेही ते म्हणाले.

अमित शाह म्हणाले की, ‘प्रसारमाध्यमं नेहमी मला तुम्ही किती जागा जिंकणार असं विचारत असतात. मी देशभरातील अनेक भागांमध्ये फिरलो आहे. मला ज्यापद्धतीने लोकांचा प्रतिसाद पहायला मिळाला त्यावरुन पाचव्या आणि सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतरच भाजपाने बहुमताचा टप्पा गाठला असा आत्मविश्वास आहे. सातव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर भाजपा ३०० जागांचा टप्पा पार करेल आणि एनडीए पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली सरकार स्थापन करेल’, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply