आम्ही आश्वासनं देत नाही, तर दिलेला शब्द पाळतो, उदयनराजे भोसलेंचा शिवेंद्रसिंहराजेंना टोला

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात नेहमी या ना त्या कारणाने वाद सुरु असतात. यानंतर आता उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रसिंहराजे यांचं नाव न घेता टोला लगावला आहे. विकास कामांचे आम्ही केवळ आश्वासन देत नाही. शब्द देतो आणि तो पाळतो, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव अशी सातारा विकास आघाडी आहे, जिने केलेल्या कामच जाहीरपणे ऑडिटचे बोर्ड लावले होते, असा खोचक टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना नाव न घेता लगावला आहे. सातारा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांच्या या वक्तव्य हे सातारा विकास आघाडी आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगरविकास आघाडी स्वतंत्रपणे निवडणूक लढणार असल्याचे संकेत आहेत.

साताऱ्यात आज स्ट्रीटलाईट शुभारंभ कार्यक्रम उदयनराजे भोसले यांच्या हस्ते पार पडला. यावेळी बोलत असताना उदयनराजे यांनी नगरपालिकेत स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहे. साताऱ्यातील विकासकामांचे लोकार्पण उदयनराजे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उदयानराजेंनी नगरविकास आघाडीच्या कामांबाबत माहिती दिली आहे. तर आगामी निवडणुकांमध्ये नगरविकास आघाडीची सत्ता कायम ठेवण्यासाठी जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा