InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘मोदींच्या शब्दावर विश्वास ठेवून..’; ओमराजे निंबाळकर यांचे संसदेत मराठी भाषण

- Advertisement -

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी संसदेत तडाखेबंद मराठी भाषण केले. अर्थसंकल्पावरील अभिनंदन भाषणात बोलताना ओमराजे यांनी पंतप्रधान मोदींच्या भाषणाची आठवण करुन देत मराठवाड्यासाठी पाण्याची मागणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी औसा येथील मतदारसंघात निवडणूक प्रचारावेळी जलशक्ती मंत्रालय स्थापन करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार, त्यांनी त्याची अंमलबजावणीही सुरू केल्याचे निंबाळकर यांनी म्हटले.

लोकसभा सभागृहात चक्क मराठीतून जोरदार भाषण करताना, आम्हाला कुठलंही पॅकेज नको, आम्हाला कुठलिही आर्थिक मदत नको. आम्हाला कर्जमुक्तीही नको. पण, माझ्या मराठवाड्याला आमच्या हक्काचं 21 टीएमसी पाणी द्या, अशी मागणी ओमराजे यांनी केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने 21 टीएमसी पाणी मराठवाड्याला न देऊन आमच्यावर अन्याय केल्याचा आरोपही ओमराजे यांनी केला.

साहेब, मी सकाळपासून जेवणही केलं नाही. मोदींच्या शब्दांवर विश्वास ठेऊन 1 लाख 28 हजार मतांनी विजयी करुन लोकांनी मला या सभागृहात पाठवलंय. कारण, मोदींनी दिलेला शब्द ते पूर्ण करतील, अशी अपेक्षा या लोकांना आहे. त्यामुळे, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी याची दखल घेत, आमच्या मराठवाड्याला हक्काचं पाणी द्याव. अर्थसंकल्पात आमच्या पाण्याची तरतूद करावी, अशी मागणी ओमराजे यांनी केली.

- Advertisement -

लोकसभा सभागृहात अर्थसंकल्पावरिल चर्चेत सहभाग#लोकसभा_अधिवेशन #अर्थसंकल्प२०१९ #उस्मानाबाद #धाराशिव #युवासेना #शिवसेना #MP #खासदार #OmrajeNimbalkar #ShivSena #Yuvasena #Dharashiv #Osmanabad

Geplaatst door Om Rajenimbalkar – ओम राजेनिंबाळकर op Dinsdag 9 juli 2019

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.