आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही, पण अंगावर आलं तर सोडत नाही : देवेंद्र फडणवीस

मुंबई : भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याची भाषा केली. त्यानंतर शिवसेना त्यांच्यावर तुटून पडली आहे. कार्यकर्ते-नेते-पदाधिकाऱ्यांनी उत्तरं देऊन झाल्यावर खुद्द मुख्यमंत्र्यांनीही थपडीची भाषा केली. लाड यांच्या विधानानंतर त्यांच्या दिलगिरी व्यक्त करणाऱ्या व्हिडीओशिवाय भाजपाकडून अधिकृत अशी भूमिका आली नव्हती.

यानंतर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “तोडफोड करणं आमची संस्कृती नाही, आम्ही तोडफोड करत नाही”, असं फडणवीस म्हणाले आहेत. तसेच आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही, पण कोणी अंगावर आलं तर सोडत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना प्रसाद लाड यांनी एक चिथावणीखोर वक्तव्य केलं. शिवसेनेला वाटतं की आम्ही माहीममध्ये आल्यावर सेना भवन फुटेल. त्यांना सांगतो की वेळ आली तर आम्ही ते सुद्धा करू, असं प्रसाद लाड म्हणाले. यानंतर शिवसेेना नेत्यांनी प्रसाद लाड यांच्यावर टीकेची झोड उठवली.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा