“मै तो फकीर हूं असे दरिद्री विचार आमचे नाहीत”

मुंबई : आज शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विरोधकांवर तुटून पडले. आज मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात झालेले दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपला लक्ष्य करताना मोठ्या प्रमाणावर टीका केलीय. शिवसेना प्रमुख बाळासाहेबांना दिलेल्या वचनाचा उल्लेख केला. मी मोठ्या जबाबदारीने हे पद स्वीकारले आहे.

पण बाळासाहेबांना दिलेले वचन पूर्ण करायचे आहे. मी शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार असे वचन दिले आहे. त्यामुळे एक दिवस मी तुमच्यापैकी एका माझ्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणारच, असे मोठे विधान आणि आश्वासन उद्धव ठाकरे यांनी केले. त्यांच्या या विधानाने शिवसैनिकांमध्ये मध्ये नवा उत्साह संचारला आहे.

यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींना देखील निशाण्यावर घेतलं. हर्षवर्धन पाटील अशी लोकं भाजपची ब्रॅन्ड अॅम्बेसिटर झालं पाहिजे. आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही आणि अंगावर आलो तर आम्ही कोणाला सोडत नाही. ‘मै तो फकीर हूं असे दरिद्री विचार आमचे नाहीत’, असा टोला मोदींना उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा