“किरीट सोमय्यांना आम्ही ओळखत नाही, एखाद्याला काही विशेष माहिती असेल तर…”

मुंबई : भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप लावले आहेत. अशातच आज किरीट सोमय्या कोल्हापूरातील सेनापती संताजीराव घोरपडे कारखान्याची पाहणी करण्यासाठी जाणार आहेत. पाहणीनंतर ते पत्रकार परिषद घेऊन ग्रामविकासमंत्री यांच्यावर घोटाळ्याचा नवीन आरोप करणार आहेत.

यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या आज सकाळी महालक्ष्मी एक्सप्रेसमधून कोल्हापूरला चालले होते. परंतु सोमय्या कोल्हापूरात पोहचण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना कराडमध्ये रेल्वेमधून खाली उतरवलं आहे. तिरुपती काकडे यांनी विनंती केल्यानंतर किरीट सोमय्या कराडमध्ये रेल्वेतून खाली उतरले. यानंतर सोमय्या यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. कोल्हापूरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं सांगत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

याच सगळ्या पार्शभूमीवर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषदे घेतली. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना किरीट सोमय्यांना आपण ओळखत नसल्याचं म्हटलं आहे. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, किरीट सोमय्या यांना आम्ही ओळखत नाही. या देशात प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काम करत असतो. जर एखाद्याकडे काही विशेष माहिती असेल तर त्याने ती माहिती पोलिसांना द्यावी.

महाराष्ट्रातील सरकार कायद्याच्या चौकटीत राहून काम करणारे सरकार आहे. राजकीय द्वेषापोटी कोणी चिखलफेक करायचं ठरवलं असेल तर त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. राजकारणात आरोप प्रत्यारोप होत असतात. परंतु तुम्ही कोणत्या स्तरावर जावून आरोप करताय हे महत्वाचं आहे, असं देखील राऊत यांनी यावेळी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या