‘आमची ईडी लागली, आता तुमची सीडी लावा’ ; गिरीश महाजनांचा खडसेंना टोला

जळगाव : मागील वर्षी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता, यावेळी त्यांनी तुम्ही मला ईडी लावाल तर मी सीडी लावेल असा दावा केला होता. यानंतर एकनाथ खडसे यांनी काल पुन्हा एकदा लवकरच सीडी लावणार असल्याचं विधान केलं आहे. या विधानावरून भाजप नेते गिरीश महाजन यांनी खडसेंना डिवचलं आहे.

सीडीचा विषय आता जुना झाला आहे, आमची ईडी लागली आता तुमची सीडी लावा, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना गिरीश महाजन यांनी राज्य सरकारवर वीज पुरवठा खंडित करणे आणि मंदिर उघडण्यावरून निशाणा साधला. मात्र, महाजन यांच्या या विधानावर आश्चर्यही व्यक्त केलं जात आहे. तसेच या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

भाजपनेच खडसेंच्या मागे ईडी लावल्याचं महाजन यांनी कबूल केल्याचीही जोरदार चर्चा रंगली असून अनेक तर्कवितर्कही लढवले जात आहेत. तसेच सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी अडचणीत असून त्यांचा वीज पुरवठा खंडित करणं हे चुकीचं आहे. त्यामुळे महावितरणाच्या कारभाराविरुद्ध एखादं आंदोलन उभारावं लागणार असल्याचं गिरीश महाजन महाजन यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा