InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

माझा नवरा घाबरणारा नाही, अशा आम्हाला अनेक नोटीसा आल्या – शर्मिला ठाकरे

- Advertisement -

ईडी, सीबीआय ची आम्हाला सवय आहे.  नोटीसा पाठवून दबावात ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. पण, माझा नवरा घाबरणारा नाही, ही दबावतंत्राची  पध्दत आहे, अशा आम्हाला अनेक नोटीसा आल्या आहेत, अशी प्रतिक्रिया मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे.

कोहिनूर मिल विक्रीप्रकरण आणि या व्यवहारातून आम्ही २००८ मध्येच बाहेर पडलो आहे. याबाबतच्या सर्व कागदपत्रे  त्यांना देऊ.  आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून माझ्या नवऱ्याला बिझी ठेवण्याचा हा प्रयत्न आहे.  राज ठाकरे  चौकशीला  बोलावले तर  नक्की जाणार,  असे सांगून माझा नवरा घाबरणारा नाही, असे शर्मिला ठाकरे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

भाजप म्हणजे डोळे मिटून दूध पिणारे मांजर आहे. ज्या पद्धतीने भाजप विरोधकांवर तुटून पडले आहे, त्यावरून ते सूडाचे राजकारण करत असल्याचे सिध्द होत आहेत.  आमच्यावर सरकारचे खूप प्रेम आहे. ईडी, सीबीआय ची आम्हाला सवय आहे.  दबावात ठेवण्याचा हा प्रयत्न आहे,  असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या .

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.