शुन्याचे शंभर कसे होतील याची धमक आपण ठेवली आहे ; जयंत पाटील

यवतमाळ : सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांचा महाराष्ट्रभर राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा सुरु आहे. यानिमित्ताने जयंत पाटील हे यवतमाळमध्ये आले होते. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी विरोधकांवर टोला लगावला.

शुन्य असेल तर त्या शुन्याचे शंभर कसे होतील याची धमक आपण ठेवली आहे. शरद पवार या विचारांचा हा पक्ष आहे. त्यामुळे ऐकीने पक्ष वाढविण्यासाठी कामाला लागा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यवतमाळ जिल्हा कार्यकारिणी आढावा बैठकीत केले.

यामध्ये पाटील म्हणाले, मला रॅलींची अपेक्षा नाही. मी पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आलो आहे. आपल्या सर्वांना मिळून हा पक्ष बांधायचा आहे. जे खरं आहे ते स्वीकारले पाहिजे असेही जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा