कोंबड्यांसाठी सरकार बनवण्याचं भाकीत करावंच लागतंय; मलिकांचा राणेंना जोरदार टोला

मुंबई : २०१९ ला शिवसेनेने २५ वर्षे सुरु असलेली भाजपासोबतची युती तोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत राज्यात सरकार स्थापन केले. यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांची महाविकासआघाडी अस्तित्वात आल्यापासून या आघाडीच्या विचारसरणीवर या सरकारवर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. भिन्न विचारसरणीचे हे तीन पक्ष एकत्र कसे येऊ शकतात? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.

यानंतर हे सरकार पडणार असं विरोधकांकडून वारंवार सांगितलं जात आहे. केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी आता याबाबत वक्तव्य केल आहे. मार्च महिन्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यावर महाराष्ट्रात पुन्हा भाजपचे सरकार येणार अशी नवी राजकीय भविष्यवाणी नारायण राणे यांनी केली आहे. राणेंच्या या भविष्यवाणीवर राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विटरद्वारे ट्विट करत निशाणा साधला आहे.

नवाब मलिक म्हणाले, काही लोकांकडे २३ वर्षात नावसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की आता ‘त्या’ कोंबड्यांसाठी सरकार बनवण्याचं भाकीत करावंच लागतंय, अशा शब्दात त्यांनी थेट नारायण राणे यांना टोला लगावला आहे. त्याच सोबत हे महाविकास आघाडी सरकार खंबीर सरकार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. लवकरात लवकर महाराष्ट्रात भाजप सरकार सत्तेत येईल, असे भाकीत नारायण राणे यांनी केले होते.

महत्वाच्या बातम्या

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा