तुम्ही आमच्या फोनमध्ये काय वाचता हे आम्हाला माहितीये; Pegasus हॅकिंगवरून राहुल गांधींचा टोला

नवी दिल्ली : Pegasus सॉफ्टवेअर हॅकिंग प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेत केंद्र सरकारवर टीका केली आहे. तुमच्या फोनमधील ते काय वाचत आहेत आम्हाला माहीत आहे, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वी Pegasus सॉफ्टवेअरद्वारे भारतातील पत्रकार आणि नेत्यांसह इतरांचे फोन टॅप करण्यात आल्याचा दावा आंतरराष्ट्रीय मीडियाने केला आहे.

इस्रायलची एक कंपनी एनएसओ ग्रुपने हॅकिंग सॉफ्टवेअर Pegasusचा वापर करून अनेकांचे फोन टॅप केल्याचं उघड झालं आहे. मीडिया रिपोर्टनुसार लीगल कम्युनिटीशी संबधित लोक, उद्योजक, सरकारी अधिकारी, वैज्ञानिक, कार्यकर्ते आणि इतरांचे नंबर या लिस्टमध्ये आहेत. या लिस्टमध्ये 300 हून अधिक भारतीयांचे मोबाईल नंबर असल्याचा दावा केला जात आहे.

तसेच, पेगासस सॉफ्टवेअर प्रकरणात देशातील 30 पत्रकारांवर नजर ठेवली जात असल्याची माहिती समोर आली होती. रविवारी रात्री हे प्रकरण समोर आलं होतं. थेट केंद्र सरकारवर टीका झाल्यानं केंद्रानं या प्रकरणावर तात्काळ उत्तर दिलं आहे. पत्रकार तसेच इतर भारतीयांच्या गुप्तहेरी केल्याच्या आरोपाचं त्यांनी खंडन केलंय. भारतीय लोकशाहीत खासगीपणा हा एक अधिकार आहे. वृत्तसंस्थेने दिलेले वृत्त पुर्णपणे खोटं असल्यांचं सरकारने सांगितलंय.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा