‘आम्ही एका महान खेळाडूला गमावलं’; मिल्खा सिंग यांच्या निधनानंतर मोदींनी व्यक्त केलं दु:ख

मुंबई : भारताचे महान धावपटू मिल्खा सिंह यांचे निधन झाले. वयाच्या 91 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्याच आठवड्यात त्यांच्या पत्नी निर्मल कौर यांचे कोरोनामुळे निधन झाले. मिल्खा सिंह फ्लाईंग सिख नावाने प्रसिद्ध होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून मिल्खा सिंग यांना आदरांजली वाहिली आहे. मिल्खा सिंग यांच्या निधनामुळे आपण महान खेळाडूला मुकलो आहोत, असं नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यांच्यासारखं प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून निघून जाणं हे फार दुख:द आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

करोडो भारतीयांच्या हृदयात ज्यांनी हक्काचं स्थान मिळवलं होतं. ते मिल्खा सिंग आपल्यात राहिले नाहीत, त्यांच्या निधनाने मी दु:खी आहे. काही दिवसांपूर्वी मी मिल्खा सिंगजी यांच्याशी चर्चा केली. हे आमचं शेवटचं संभाषण होईल असं मला वाटलं नव्हते. त्यांच्या आयुष्याच्या प्रवासामधून बरेच अॅथलीट्स धडे घेतील, शिकतील. त्यांच्या कुटुंबीयांबद्दल आणि जगभरातील अनेक चाहत्यांविषयी माझ्या संवेदना व्यक्त करतो, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

दरम्यान, मिल्खा सिंह यांना 19 मे रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. परंतु अचानक त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना चंदीगढच्या pgi रुग्णालयत भरती करण्यात आले. आॅक्सिजन लेव्हल 56 पर्यंत गेली होता जिथे काल (18 जून) रात्री 11.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली गेल्याच आठवड्यात पत्नीचे निधन झाले होते. परंतु आयसीयूमध्ये असल्याने पत्नीच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांना उपस्थितीत राहता आले नाही.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा